अभिनेते प्रशांत दामले म्हणजे मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका गाजवणारे हरहुन्नरी कलाकार आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे.
प्रशांतजींनी 1982 साली आपल्या एक्टिंग करिअरची सुरुवात केली. आज गेले 36 वर्षांहून जास्त त्यांचे अथक काम चालूच आहे. आजही ते नवागत आलेल्या कार्यकर्त्याप्रमाणे तितक्याच उत्साहाने नवीन कार्यक्रमासाठी तयार असतात.
सध्या प्रशांत दामले प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ हे नाटक प्रेक्षकांनी उचलून धरले आहे आणि नाट्यगृहां मध्ये गर्दी खेचून आणण्यात यशस्वी ठरते आहे. त्याच प्रमाणे प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी असलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे ही नाटक यशस्वीरित्या सुरू आहेत. परदेशातही हे नाटकं यशस्वी होत आहेत.
आज पर्यंत त्यांचे 12472 हुन जास्त नाटकाचे प्रयोग झाले आहे त्याचप्रमाणे चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नावावर चाळीसहुन अधिक टीव्ही सिरीयल्स पण आहेत. सध्या Z टीव्हीवर सुरू असलेली ‘आम्ही सारे खवय्ये’ ही मालिका गाजत आहे. ही मालिका ते गेले सहा वर्ष करत आहेत.
आज त्यांचा चाहतावर्ग अफाट आहे. आणि सोशल मीडियावर सतत सक्रिय राहुन आपल्या फॅन्स ना खुसखुशीत उत्तरं देण्यात अग्रेसर असल्याने त्यांचा चाहता वर्ग वाढतच आहे. असाच एक किस्सा सध्या गाजत आहे.
https://myntr.it/fRrs6Ji
त्याचे झाले असे की प्रशांतजींची फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली गेली. दसऱ्याच्या निमित्ताने ती पोस्ट त्यांनी शेअर केली होती. सध्या जोमात चाललेल्या नाटकांचे अनेक दौरे सुरू आहेत. तर या दौऱ्यांसाठी लागणाऱ्या बसची पूजा प्रशांत जी करीत आहेत, अशी ती पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये प्रशांत जी काळ्या रंगाच्या पोशाखात बसची पूजा करताना दिसत आहेत. त्या पोस्टवर कोणी एका फॅन ने ‘दामले दादा चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्यावर प्रशांतजींनी आपल्या सर्वज्ञात हजरजबाबी लकबीने ‘उघडा कसा येणार?’ असे खुसखुशीत मजेदार उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने त्यांचा हजरजबाबीपणा पुन्हा एकदा दिसून आला. त्यांचे हे उत्तर भरपूर वायरल झाले आहे.
https://myntr.it/iFhxvmP